अकबर शेख (प्रतिनिधी) सोलापूर "आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यास वाहून घेऊन जो कार्य सिद्धीस नेतो, गुरुचरणी समर्पित भावनेने तहानभूक हरपून सेवा रुजू करतो, त्यांना श्रीगुरू चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीगुरू तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचा कृपाशीर्वाद सदैव लाभतो. होटगी, फताटेवाडी, यत्नाळ, शिंगडगाव, हिपळे, औज (आ) आदी परिसरातील समाजाला जगणं कसं असावं हे सुद्धा माहीत नव्हतं, अशा समाजातील तरुण पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून माणुसकीच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य महास्वामीजींनी केले. याच परिसरातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरात येणे शक्य नव्हते हे ओळखून पूज्य महास्वामीजींनी ग्रामीण भागातच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता शाळा काढल्या. श्री. बृहन्मठ होटगी संस्थेत धार्मिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले जाते. श्रीगुरुंनी मानवाच्या उद्धारासाठी धर्माचे ज्ञान व संस्कार देणाऱ्या, आध्यात्मिक केंद्र असलेल्या मठात २० व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांच्या सिद्धलिंग विजय, भंगारद बट्टल याबद्दल उपदेश केला. धार्मिक व सामाजिक नाटकांतून शिवभक्ती कशी असावी, विधिवत लिंगपूजा कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अशा गुरुंच्या चरणी समर्पित भाव तसेच अपार श्रद्धा ठेवल्यास आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण होऊन आपले जीवन सुखी समाधानी होईल." असे प्रतिपादन काशीपिठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी केले. एस. व्ही. सी. एस. प्रशाला, भवानी पेठ, सोलापूर यांच्या वतीने प. पू. ष. ब्र. लिं. श्री. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या *६९व्या* गुरुपुण्याराधनानिमित्त आयोजित पालखी महोत्सवात ते बोलत होते.
श्रीगुरु चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन *काशीपिठाच्या जगद्गुरुंच्या* दिव्य सान्निध्यात एस. व्ही. सी. एस. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रारंभी *बनशंकरी मंदिरात* प्रशालेतील सहशिक्षक *श्री. मन्मथेश्वर हिरेमठ, संगमेश्वर पुराणिक* यांनी केलेल्या विधिवत पूजनाने व मंगल आरतीने पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.
पालखी मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी *प्राचार्य श्री. राम ढाले सर* म्हणाले की,"श्री. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी अलौकिक, तेजोमयाचे दिव्य वलयांकित रूप असूून ते श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे दैवत आहेत."
यासमयी महिला जनजागृती व सक्षमीकरण पथनाट्य तसेच श्री चन्नवीराय नमः, श्री. सिद्धेश्वर महाराज, आदि देवतांच्या गीतांवर आधारित अप्रतिम नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे *विठ्ठल-रुक्मिणीचा* पोषाख परिधान केलेले विद्यार्थी तसेच *ढोल, ताशा, लेझीम,* आदी वाद्यांच्या गजरात मोठया उत्साहात महास्वामीजींच्या *प्रतिमेसह पादुकांची* भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुक सोहळ्यास *नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी, मा. नगरसेवक केदार उंबरजे, चंद्रकांत रमणशेट्टी, व्यंकटेश चाटला, मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर सर, राहुल जवळकोटे, शिवलिंग शाबादे* आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पालखी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी *सद्भभक्तांनी* पुष्पवृष्टी करून, सुबक रांगोळीच्या पायघड्या घालून मोठ्या भक्तीभावाने पालखी व मिरवणुकीचे भव्य स्वागत केले. तसेच पूज्य महास्वामीजींच्या या पालखी सोहळ्याच्या अग्रस्थानी सुवासिनी डोक्यावर जलकुंभ घेऊन मार्गस्थ झाल्या.
पालखी मिरवणूक जि. प. शाळा शेळगी, पंचमुखी हनुमान मंदिर, बनशंकरी मंदिर, नंदिकेश्वर सोसायटी, करंजकर नगर, शिवसृष्टी नगर, शिवगंगा नगर, कामाक्षी नगर, मठ डॉक्टर कॉर्नर, योगीनाथ सोसायटी मार्गावरून जात असताना *महादेव वांगीकर, सुनिता मुदकण्णा, सोमनाथ रगबले, भीमाशंकर पटणे, योगीराज स्वन्ने, व्यंकटेश चाटला,मन्मथेश्वर हिरेमठ, सुमित चिलोबा, महादेव स्वामी, श्री.मळगे (मंगल कार्यालय व्यवस्थापक) वैजिनाथ अजगुंडे,महारुदय्या स्वामी* आदी मठाच्या सद्भभक्तांनी प्रसाद वाटप करत पूज्य महास्वामीजींच्या चरणी सेवा समर्पित केली. योगीनाथ सोसायटी येथील महास्वामीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंदिरात महिला भजनी मंडळांनी भजनाच्या माध्यमातून 'गुरू तुम्ही हो माता पिता' या भजनाच्या माध्यमातून गुरूचरणी आपली सेवा समर्पित केली.
या पालखी मिरवणुकीस प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्ग biदर्शन लाभले.
याप्रसंगी स्काऊट गाईडचे प्रमुख *श्रीकांत शेटे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीकांत बिराजदार, प्रकाश गुरव, गजानन कुलकर्णी, गीताभारती रामपुरे, रेखा मड्डे, रूपा घाळे, सावित्री बिराजदार, अर्जुन गड्डी यांच्या उपस्थितीत प्रशालेतील आर. एस. पी. व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी *स्वच्छता दूत* म्हणून काम केले.
प्रभातफेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments