अक्कलकोट गणेश (प्रतिनिधी) जिल्हाध्यक्ष:-मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
करुणामूर्ती माता रमाई यांची 127 वी जयंती अक्कलकोट शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी आयु. उर्मिला राजकुमार बनसोडे मॅडम व आयु सविता कसबे ताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे जिल्हा प्रवृत्ती दिलीप कदम जिल्हा संघटक सिद्धाराम घटकामुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर आयुष्यमान राजकुमार बनसोडे सर, तालुका प्रवक्ते आयुष्यमान दिलीप कदम साहेब जिल्हा प्रवक्ते व मेजर कमलाकर कांबळे यांनी माता रमाई यांच्या बद्दल त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग व त्यांची जीवन कहाणी विस्तार करून आपापले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार तालुकाध्यक्ष आयुष्यमान दत्ता कांबळे यांनी मांडले तसेच या कार्यक्रमास आयुष्यमान रविराज गायकवाड , आयुष्यमान श्रीशैल शिवशरण कोषाध्यक्ष प्रकाश पोटे ,अनिल बनसोडे ,संबोदेव सूर्यवंशी ,भीमाशंकर घटकामुळे चंद्रकांत शिंगे सर ,कृष्णा धोडमनी सर ,शमसंना मनोरे शिवशंकर गुजले प्रकाश गायकवाड संस्थेच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक तालुका संस्कार प्रमुख आकाश गायकवाड यांनी केले यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments