Hot Posts

6/recent/ticker-posts

सुशांतसिंग रजपूत व दिशा सालियन याच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी सभागृहात ‍सत्तधारी व विराेधक भिडलेने गदारेाळ विराेधकांचा सभात्याग

Jagdish Kore (प्रतिनिधी): मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची व्यवस्थापिका दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेत एकमेकांना भिडल्यामुळे सभागृहात राडा होऊन विरोधकांनी सभात्याग केला. 

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी पुरावे नष्ट करण्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हात होता का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली. यावर विरोधकांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास बंद अहवालाचा (क्लोजर रिपोर्ट) हवाला देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सीबीआयवर तुमचा विश्वास नाही का, असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. 

ज्या ठिकाणी सुशांतसिंगचा मृत्यू झाला, त्या सदनिकेचा ताबा ठाकरे सरकारने त्वरित परत का केला, असा सवाल करून या प्रकरणातील ठाकरे सरकारच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी राम कदम यांनी केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एक नेते हे सुशांत सिंग ची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचे प्रवक्ते असल्याचा आरोप कदम यांनी केला. कदम यांच्या या आरोपानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी या विधानावर आक्षेप घेऊन सभागृहात गोंधळ घातला आणि सभा त्याग केला. 

पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर दिशाच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्याबाबत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याचप्रमाणे, सीबीआयने तीन वर्ष तपास करून क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. मोदी यांच्या अखत्यारीत असलेल्या सीबीआय वर तुमचा विश्वास नाही का, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी केला. 

याला उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, सीबीआयचा अहवाल नाकारण्याचा, फेटाळण्याचा कोणताही मुद्दा येत नाही. यात कोणावर कुरघोडी करण्याचाही मुद्दा नाही. मात्र, मृत दिशा सालीयान हिच्या वडिलांनी तिच्या मृत्यूच्या तपासाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकार कार्यवाही करेल. 

विधान परिषदेत देखील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली. ज्येष्ठ वकील निलेश ओझा यांनी याप्रकरणी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी ही त्यांनी केली. याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे सांगितले. 

Post a Comment

0 Comments