जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापुर - पवित्र रमज़ान चे औचित्य साधुन सोलापुर चे सुपुत्र महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांच्या माहें रमजान ध्वनि चित्र फितीचे प्रकाशन सोलापुर च्या मा. अपर जिलाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. ऐ मोमीनो उठो माहें रमजान आगया , ये रबका है फ़रमान माहें रमजान आगया असे या गीता चे बोल असुन हे गीत टि सिरीज़ म्यूजिक कंपनी मधुन प्रसारित करण्यात आला आहे . या गीताचे गायक , संगीतकार , गीतकार स्वता मोहम्मद अयाज आहेत. हे गीत अल्लाह कृपावंत , दयावंत आहे . ब्रह्ममांड नायक आहे , तथा या सृष्टि चा निर्माण करता आहे , झोपेतून जागे व्हा आणि अल्लाह ईश्वर च्या चरणी नतमस्तक व्हावं तसेच अल्लाह च्या नावाने रोजा ( उपवास) करुन वाईट विचारांचा त्याग करुन एक चांगला माणूस व पर उपकारी म्हणून जगण्याचा संदेश या गीतातुन मोहम्मद अयाज यांनी दिलेला आहे . समस्त मानव जातीला हे गीत समर्पित म्हणायला हरकत नाही.
मा. अपर जिलाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी मोहम्मद अयाज यांच्या ध्वनि चित्र फितीचे प्रकाशन करुन अयाज यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत हे गीत लोकार्पण केले.हा प्रकाशन सोहळा दिनांक २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला
----------------------------------------
फोटो मधे - मा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह व सोलापुरचे गायक मोहम्मद अयाज
0 Comments