Hot Posts

6/recent/ticker-posts

नविन शैक्षणिक धाेरणानुसार पहिल्या ईयत्ते पासून हिंदी शिकणे अनिवार्य करणेत आले. आहे. देवेंद्र फडणवीस.

Jagdish Kore (प्रतिनिधी): मुंबई: राज्यातील शाळांमध्ये मराठीप्रमाणेच हिंदी शिकण्याची सक्ती करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणेच अनेक साहित्यिकांनी देखील विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. इंग्रजी भाषेला पालखी आणि हिंदी भाषेला विरोध हा कुठला विचार आहे, असा परखड सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हिंदी भाषेची सक्ती करण्याबाबत आपण यापूर्वीच आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याचप्रमाणे देशभरात संवादाचे एक सूत्र निर्माण करण्यासाठी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून महाराष्ट्रात या धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. मात्र, हिंदी भाषेच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध व्यक्त केला आहे. या सक्तीच्या विरोधात टोकाचा संघर्ष करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. मराठी भाषेला अन्य कोणत्या भाषेचा धोका नाही. मात्र, गुजराथी भाषेपासून मराठीला धोका आहे, असे ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments