Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. वळसंगकर आत्महत्याप्रकरणी रुग्णालयातील महिलेस अटक



   अकबर शेख (प्रतिनिधी)सोलापूर :महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या डॉ.  शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुरनं. 365/2025 भा न्या सं कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा प्रकार 12  मृत्यूस कारणीभूत असे नमूद करण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास डॉ. वळसंगकर यांच्या घरातील बाथरूममध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर (वय 45, वर्ष, रा. एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (राहणार सोलापूर) हिच्याविरुद्ध 19 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

आरोपी मनीषा ही वळसंगकर हॉस्पिटलमध्ये काम करत होती.तिला डॉक्टर वळसंगकर यांनी वेळोवेळी सहकार्य करून देखील आरोपीने फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून राहते घरी स्वतःच्या बेडरूम मधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टलमधून कानशीलमध्ये गोळी घालून आत्महत्या केली व आरोपी मनीषा ही फिर्यादीच्या वडीलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. असे डॉ. अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

*कोण आहे मनीषा माने?*

मनीषा माने ही मरीआई चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि गिरणी कामगार तसेच व्यवसायाने गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची कन्या आहे . हरिभाऊ यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. तिचा विवाह सर्वप्रथम मुसळे नाम व्यक्तीशी झाला होता.मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला. पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला दोन मुले आहेत. मुलीने दुसरा विवाह केल्यामुळे निंबाळकर कुटुंबीय तिच्याशी बोलत नव्हते .काही वर्षांपूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचे निधन झाले. त्यावेळी मनीषा ही वडीलाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळीवस्ती येथे गेल्यानंतर तिच्या भावांनी तिला तिथे येण्यापासून मज्जा केला होता. मात्र मनीषा हिने चिडून तिसऱ्या दिवशीचा विधी स्वतःच उरकून वडिलाप्रती आपली भावना व्यक्त केली होती, याचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती. कालांतराने डॉक्टर वळसंगकर यांच्या घरातली ती मेंबर बनली. हॉस्पिटलमध्ये बघता बघता टॉपवर गेली. डॉक्टर वळसंगकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वट्ट चालत होता. डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफसुद्धा तिला टरकून होता. तिचे इतके प्रस्थ होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हलत नव्हती, अशी परिस्थिती होती. सामान्य घरातून आलेली आणि जवळपास २० ते २५ वर्षे हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुखपद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत असे समजते. डॉक्टरांची जणू ती एक मानसकन्या असल्याची कर्मचाऱ्यात चर्चा आहे. डॉक्टर वळसंगकर यांना हॉस्पिटलमधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिलासुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कुणकुण लागताच तिने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मी इतकी वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केले, मला दोन आपत्य आहेत, माझ्या कुटुंबाचे पुढे कसे होणार? मला कामावरून काढल्यास मी आत्महत्या करेन, अशी तिने धमकी दिली होती. त्याचा सर्वात मोठा तणाव डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्यावर होता. मनीषा खूप वर्षापासून हॉस्पिटलचे कामकाज बघत आहे शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्येसुद्धा वाद होता. त्यातूनच डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस तपासात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर बझार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments