Hot Posts

6/recent/ticker-posts

सिजफायर मागची खरी हकीकत



जगदीश कोरे (प्रतिनिधी). दिल्ली:-इंटरनेट वरील उपलब्ध माहिती व व्हिडिओज यांच्या आधारावर, विषय सर्वांना समजेल अशा शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

7 मेला पहाटे 2 वाजता, आपण ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर, 9 मेच्या रात्री पाकने ड्रोन हल्ले सुरू केले. सुरुवातील फक्त काश्मीर मध्ये सुरू असलेले हे हल्ले, हळूहळू पंजाब, राजस्थान आणि नंतर गुजरात पर्यंत सुरू झाले. यातील सर्वच्या सर्व भारतीय सैन्याच्या Air Defense System अर्थात अवकाश संरक्षण प्रणालीने हवेत उधळले. इतकेच नाही तर पाकची Air Defense System, रडार यंत्रणा सुद्धा निकामी करून टाकली.

तरीही 10 मेला पाकने पुन्हा आगळीक केली आणि कुरापत काढून, भारतीय सैन्य, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय व्यवस्था यांना एकप्रकारे आव्हान दिलं. 

किंबहुना ते आपली संरक्षण व्यवस्था, सैन्य, आणि मोदी डोवाल या जोडीला आव्हान होतं. मुख्यतः अमेरिकन आणि पाश्चिमात्य जगताने तशी प्रतिमा भारताबद्दल निर्माण करून ठेवली आहे आणि भारताची संरक्षण सज्जता किती असेल, याचा कोणालाच अंदाज नव्हता.  त्यातच त्यांनी 10 तारखेला साधारण मध्यरात्री पाकने फतेह II  हे क्षेपणास्त्र दिल्लीच्या दिशेने डागलं. 400 किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र पाकमधल्या पंजाब प्रांतातील हवाई दलाच्या तळावरून दिल्लीकडे डागण्यात आलं. हे क्षेपणास्त्र सिरसा, हरयाणा इथे भारताने हवेतच नष्ट केलं. 

या क्षेपणास्त्राने जर लक्षभेद केला असता तर, भारताचं प्रचंड नुकसान झालं असतं. कारण त्याचं टार्गेट दिल्ली होतं. ही गोष्ट खूप गंभीर होती, असता गप्प बसून चालणार नव्हतं. म्हणूनच या हल्ल्यानंतर साधारण दोन ते अडीच तासात, भारताने आपली क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या संरक्षण हवाई तळावर डागली. ज्याच्या माऱ्याने नूरखान हवाई तळ रावळपिंडी, मुरीद हवाईतळ चकवाल, रफिक हवाई तळ शोरकोट या व्यतिरिक्त इतर 8 हवाई तळांना प्रचंड नुकसान झालं. पाकचं झालेलं नुकसान मी आधीच्या लेखात इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत लिहिलं आहेच. म्हणून त्यावर आता खल करत नाही.

आता खरा मुद्दा मांडतो. उध्वस्त झालेल्या, एकूण 11 पाकिस्तानी हवाई तळांपैकी, 2 अती संवेदनशील आणि अती महत्वाची ठिकाणं आहेत. त्याबद्दल आता बोलूया. नूरखान हवाई तळ रावळपिंडी आणि किराना हिल्स सरगोधा. त्यातील नूरखान या हवाई तळावर पाकिस्तानचा 170 च्या आसपास अणुबॉम्बचा साठा आहे, अशी अनधिकृत माहिती आहे. 

या ठिकाणी असणाऱ्या अणू साठ्यावर 10 तारखेच्या रात्री झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात, असं अनधिकृतपणे समजतं की, जमिनीखालील अणुबॉम्बचं रूपांतर उकडलेल्या बटाट्यात झालं आहे. म्हणजेच आता हे बॉम्ब निकामी झाले आणि आता काहीही कामाचे राहिले नाहीत. ही जागा पाकची राजधानी इस्लामाबाद पासून फक्त 10 किलोमीटर इतकी जवळ आहे. 

तर दुसरीकडे किराना हिल्स मध्ये त्याच अणुबॉम्बच्या काही महत्वाच्या भागांचा साठा आहे.  या दोन ठिकाणी 4 मोठे पाण्याचे रियाक्टर्स आहेत. या ठिकाणी अणुबॉम्बसाठी लागणाऱ्या प्लुटोनियम ची निर्मिती होते. किराना हिल्स इथे जमिनीखाली एकूण 5 मोठे बंकर्स वजा अत्यंत मजबूत टॅनेल्स आहेत. त्यामध्ये निर्मित प्लुटोनियम साठा आहे. 10 तारखेच्या रात्री झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात यातील 4 बंकर्स उध्वस्त झाले आहेत. 

या सर्व गोष्टी अधिकृतपणे कुठेही भारताने स्वीकारलेल्या नाहीत. पण हे घडताच अमेरिकन स्पेशल विमानातून न्युक्लिअर रेडिएशन चेक करणारी आणि त्याचा बंदोबस्त करणारी पूर्ण टीम आली, ही बातमी सगळीकडे पसरली.  सदर टीमने ताबडतोब इजिप्त कडून खास विमानाने, बोरॉन मागवलं. याच्या इतर अनेक उपयोगाबरोबर बोरॉन हे रेडिएशनचा परिणाम कमी करण्यास मदत करते. म्हणजे अनधिकृतपणे असं म्हटलं जातंय की भारताने पाकची अण्वस्त्र आणि ती बनवण्याची क्षमता पूर्ण नष्ट केली आहे. 

भारताने केलेली जागतिक कामगिरी : 

आता थोडं अजून खोलात जाऊया. मुळात पाक ही अण्वस्त्र निर्मिती करते हेच एक मिथक आहे. म्हणजे असं की पाककडे असलेली अण्वस्त्र ही अमेरिकेची पाककडे ठेवायला दिलेली अण्वस्त्र आहेत. त्या गोष्टीचा उपयोग पाक वेळोवेळी धमकी देण्यासाठी करत असे. पण प्रत्यक्षात पाकिस्तानला अण्वस्त्र निर्मिती आणि विज्ञान यातील क्ष सुद्धा कळत नाही. हे अण्वस्त्र पार्किंग फॅसिलिटी अमेरिकेला देऊन, बदल्यात पाक अमेरिकेकडून करोडो डॉलर्स आजपर्यंत घेत आला. अशीच फॅसिलिटी तुर्की मधे आहे. म्हणूनच हे दोन देश अमेरिकेच्या जोरावर  भारत रशिया दोन्हींना जुमानत नाहीत. 

त्या सर्व पार्किंग चार्जेस म्हणून फुकटच मिळत असणाऱ्या पैशाचा उपयोग गेली तीस ते चाळीस वर्षे भारता विरुद्ध दहशतवादी तयार करण्याचे अड्डे यावर खर्च करण्यासाठी केला गेला. आज परिस्थिती अशी झाली आहे की, अण्वस्त्र नष्ट झाली, ती तयार करण्याची सर्व यंत्रणा नष्ट झाली, म्हणजे अमेरिकेची, आशियातील भारत,चीन आणि रशिया यांना धाकात ठेवण्याची सर्वच योजना आणि 50 वर्षांची मेहनत भारताने नष्ट केली. 

यातील सर्व कारवाई आपण घडवून आणली. पण हे घडल्यावर अमेरिकेची पाचावर धारण बसली. बरं हे भारताने केलं याचा कुठेही अधिकृत उल्लेख नाही. पण रेडिएशन सुरू झालंय आणि त्याचवेळी पाकमध्ये भूकंपाचे 4.3 ते 5.2 क्षमतेचे धक्के बसले.  याचा केंद्रबिंदू रावळपिंडी इस्लामाबाद जवळच आहे. म्हणूनच अमेरिकेने पाकवर दबाव आणून, शस्त्रसंधी करण्यासाठी भारताला विनंती करण्याची आज्ञा दिली. 

पाकला मान तुकवावी लागली. भारताचा पुढच्या 30 एक वर्षांचा प्रश्न निकालात निघाला असल्यामुळे, भारताने ही विनंती आपल्या अटींवर स्वीकारायची तयारी दाखवली. पण मुख्य शस्त्रसंधी आधी कालच पंतप्रधान मोदींनी आपल्या अटी आणि आपली कणखर भूमिका मांडली आहे.  झालेलं नुकसान भरून यायला पाकला तीस वर्ष जातील. 

शिवाय त्यांना पूर्ण नष्ट करून 25 कोटी मुस्लिम जनतेचा भार कोण घेईल, हे फेसबुक एक्सपर्ट ना कळत नाही. याचसाठी भारतातील मुस्लिम मोदींच्या बाजूने उभे राहिले. म्हणजे पाकचा पूर्ण पराभव की तिकडचे मुस्लिम इथे यायला मोकळे. इतकी गोष्ट कुणाला लक्षात येत नाही की, अक्कलच नाही, ही कळत नाही. कारण मुस्लिम जगताची नीती आहे. परागंदा व्हायचं तर ते non muslim देशात. बालबुद्धी लोकांना समजत नाही. पण ज्यांना बुद्धीचं बळ दिलंय, त्यांनीतरी वापरावी ना. 

त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही मोदी विरोधाची काहीही फिकीर करण्याचं कारण नाही. We have taught them a lesson of century. जगही आपल्या कामगिरीवर स्तिमित आहे. सत्तेची, जगाच्या राजकारणाची, संरक्षण ताकदीची सर्वच समीकरणे आता भारताच्या बाजूने झालीत. आता जागतिक राजकारणाचं केंद्र आशिया असेल. युरोप किंवा अमेरिका नाही. आता पाकने काही केलंच तर काय हे आपण जगाला दाखवून दिलं आहेच. यापुढे अशीच अद्दल घडवत राहू. 

तुर्तास इथेच थांबतो. या विषयात खूप काही लिहिण्यासारखं आहे. त्यामुळे नक्की अजून एक लेख घेऊन येईनच. 

©® माहिती संकलन आणि लेखन:  प्रसन्न आठवले 
9049353809
9960762179
१३/०५/२०२५

Post a Comment

0 Comments