मॉस्को: वृत्तसंस्था (जगदीश कोरे प्रतिनिधी)
राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंह यांनी पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनेही शुभेच्छा दिल्या.
भारत कायमच रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे आणि यापुढील काळातही आम्ही तसेच ठामपणे रशियासोबत राहू, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी पुतीन यांना दिली. यावेळी राजनाथ सिंह आणि पुतीन यांनी दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातील भागीदारीला अधिक प्रभावी स्वरूप देण्याबाबत चर्चा केली. या भेटीपूर्वी राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांची वार्षिक द्विपक्षीय सामरिक सहकार्य बैठक पार पडली.
0 Comments