Jagdish Kor (पत्रकार):- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर थोडक्यात माहिती दिली. यंदाही
रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी आरबीआयने 25 बेसिक पॉइंट्सने (0.25 टक्के) रेपो दरात कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या कर्जाचा हप्ता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. बँकेने तब्बल पाच वर्षांनंतर रेपो दरात कपात केली आहे. याआधी 2020 मध्ये रेपो दरात कपात झाली होती. नंतरच्या काळात मात्र रेपो दरात वाढ होत 6.5 टक्क्यांवर पोहोचला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र हा दर स्थिर राहिला होता. मल्होत्रा यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या विकासावर चर्चा करण्यात आली. रेपो दरात कपात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. यानंतर आता कर्जाच्या हप्त्यात कपात होईल अशी शक्यता आहे.
0 Comments