जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई - नुकतेच पद्म विभूषण स्व. रतन जी टाटा यांच्या ८७ व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या नावानं पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या मध्ये सोलापुर चे गायक मोहम्मद अयाज यांची देखील दखल घेतली गेली. मोहम्मद अयाज यांना संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते सर रतन टाटा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा दादर माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. स्व रतन टाटा यांच्या आयुष्यातील काही आठवणी विसरता कामा नये म्हणत मो अयाज यांनी राष्ट्रीय एकात्मता वर आधारित गाणी सादर केली. रतन जी टाटा संपूर्ण आयुष्य देश सेवा मधुन व्यतीत केले. ज्यांनी आपल्या कमाईतून ८० टक्के रक्कम देशाला समर्पित केला. अशा महान रतन टाटा ची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करुन सरकार ला विनंती करतो की ज्या पद्धतीने सरकार महा पुरुषांचे जयंती साजरी करते त्याच पद्धतीने सर रतन टाटा यांची जयंती साजरी करावी अशी मागणी मोहम्मद अयाज यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते
----------------------------------------
0 Comments