सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष राम हुंडारे होते या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करून पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन सोलापूर जिल्हा सरचिटणीस याकूब तेली यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांच्या हस्ते ओळखपत्र नियुक्त पत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अडव्होकेट दिलीप जगताप ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड एजाज खलिफा विजयकुमार मोटे रविकांत रणदिवे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
*सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांनां एकत्र आणून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात मांडणार*
सोलापूर शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी बाबत पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हा सरचिटणीस याकूब तेली यांनी सांगितले आहे.
0 Comments