Hot Posts

6/recent/ticker-posts

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन


          अकबर शेख (प्रतिनिधी)सोलापूर : "शिस्त व संस्कारांचा पाझर मराठी भाषेतूनच शक्य आहे. हा पाझर विद्यार्थ्यांमध्ये वर्षानुवर्षे अखंडपणे प्रवाहित करण्याचे कार्य वीरतपस्वी प्रशाला करीत आहे. या प्रशालेला ढाले सरांसारखे तरुण तडफदार नेतृत्व लाभले, हे या प्रशालेचे वैभव आहे. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रत्येक विद्यार्थी एखाद्या राजहंसाप्रमाणे कुशल असा घडत आहे." असे प्रतिपादन सहस्त्रार्जुन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली अघोर यांनी केले. श्री. बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेत *मराठी राजभाषा गौरव दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ विद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर* होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून *सौ. वैशाली अघोर मॅडम* उपस्थित होत्या.
           प्रारंभी *वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी, तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व कविवर्य कुसुमाग्रज* यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
               याप्रसंगी प्रमुख अतिथी सौ. वैशाली अघोर मॅडम यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशालेतील सर्व मराठी विषय शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
           यासमयी प्रशालेतील विद्यार्थिनी कु. अर्पिता धप्पाधुळे, कु. अल्फिया बाणेवाले, कु. अभिलाषा सूळ, कु. आकांक्षा पवार, कु. साक्षी होटगी, कु. भक्ती नवले, कु. मानसी थोरात इ. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून आपली जन्मभूमी व कर्मभूमी ही मराठी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी काव्य वाचनातून मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगण्याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले. इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी मंगळागौर सादर केले. तद्नंतर प्रशालेतील *मराठी विभाग प्रमुख धर्मराज हिपळे, शिवाजी रानसर्जे, विद्या साबळे, लक्ष्मीकांत बिराजदार* यांनी आपल्या मनोगतातून काव्य वचन करत आपली मराठी भाषा आणि संस्कृतीची महती सांगितली.
            *कार्यक्रमाचे अध्यक्ष ढाले सर* मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले,"आपली मराठी भाषा प्राचीन काळापासून बोलली जाते. मराठी भाषा व्यवहाराची भाषा होत जाऊन तिची प्रगल्भता वाढत गेली. विविध अलंकारांनी नटलेल्या मराठी भाषेने इतर भाषेतून विविध शब्द स्वीकारले. त्यामुळे मराठी भाषेने प्रत्येकाच्या हृदयात घर केले. अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आईसाठी खूप कविता लिहिल्या गेल्या. यापुढे आपल्या प्रशालेतील भावी साहित्यिकांनी *बाप* या दुर्लक्षित परंतु कर्तबगार व्यक्तिमत्वासाठी काव्यनिर्मिती करावी आणि त्याच्या त्यागाला उजाळा देण्याचे कार्य करावे."
            कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *उपप्राचार्य श्री.  रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्गदर्शन लाभले.
           कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील *रेवणसिद्ध बिराजदार, अनिल अंबारे, रमेश प्रचंडे, मन्मथेश्वर हिरेमठ, रूपा घाळे, अर्जुन गड्डी, तुषार राठोड* इत्यादी शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  *कु. अमृता डावरे व कु. सौम्या सोळसे* यांनी केले, तर आभार *तुषार राठोड सर* यांनी मानले.

Post a Comment

0 Comments