Hot Posts

6/recent/ticker-posts

वैमानिकाचा अंदाज चुकला असावा किंवा तांत्रिक बिघाड

 
   जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई:-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागे धावपट्टीबाबत वैमानिकाचा अंदाज चुकला असावा किंवा विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा अंदाज विमान अपघातांची कारणमीमांसा करणाऱ्या डीजीसीए या केंद्रीय यंत्रणेने प्राथमिक चौकशीनंतरच्या अहवालात नमूद केला आहे.

मुंबईहून बारामती येथे येत असताना अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यावर ते एका बाजूला कलंडले व जमिनीला स्पर्श होता होता त्यात मोठे स्फोट होऊन आगीचा लोळ पसरला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी, वैमानिक व कर्मचारी मरण पावले.

या अपघाताबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात असून त्याची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्रही दिले आहे. अनेक केंद्रीय यंत्रणांसह राज्य पोलिसांचा अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीमार्फत देखील या अपघाताची चौकशी केली जात आहे.

डीजीसीएने व्यक्त केलेले अंदाज प्राथमिक स्वरूपाचे असून अपघाताच्या कारणांचा अधिक सखोल मागवा घेतला जात आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments