Hot Posts

6/recent/ticker-posts

क्षुल्लक वादातून कोयत्याचे सपासर वार, बस स्टँडसमोर भयानक थरार, हल्ल्याचा

Jagdish Kore (पत्रकार): सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत क्षुल्लक कारणावरून एकाने कोयत्याने सपासप वार करून हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत निलेश सुतार हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे.
    या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. तसेच या घटनेचा हादरवून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सोलापूरच्या पांगरी येथील बस स्टँडसमोर ही घटना घडली आहे. खरं तर बस स्टँड समोर निलेश सुतार आणि इतर दोन जण होते. निलेश सुतार हे एकटे उभे असताना एक जण कोयता घेऊन येतो. या हल्लेखोराला रोखण्यासाठी एक जण मध्ये येतो. पण त्याचा काहीच फायदा होत नाही आणि अज्ञात व्यक्ती निलेश सुतारवर हल्ला करतात. या हल्ल्यात सुतार प्रतिकार करतात त्यानंतर अज्ञात पळ काढतो. पण या घटनेत ते गंभीर रित्या जखमी होतात. ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Post a Comment

0 Comments