Hot Posts

6/recent/ticker-posts

एस व्ही सी एस प्रशालेच्या सौ. मेघाराणी कोठावळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

अकबर शेख (प्रतिनिधी) सोलापूर : शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी पतसंस्था संचलित यावर्षीच्या आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार एस व्ही सी एस हायस्कूल, भवानी पेठ सोलापूर येथील *सौ. मेघाराणी कोठावळे मॅडम* यांना जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम *मातोश्री मंगल कार्यालय शेळगी* येथे शनिवारी 27/09/2025 रोजी सायंकाळी ठीक 05:00 वाजता होणार आहे. हा पुरस्कार शहर उत्तर सोलापूरचे *आमदार श्रीयुत विजयकुमार देशमुख मालक* तसेच पुणे शिक्षक विभागाचे माजी शिक्षक *आमदार श्री दत्तात्रय सावंत सर* यांच्या हस्ते तसेच सोलापूर शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष *श्री. गुरुनाथ वांगीकर सर* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
          त्यांच्या निवडी निमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ विद्यालयाचे *प्राचार्य श्री.राम ढाले सर, उपमुख्याध्यापक तथा उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर,* शिक्षक व शिक्षिका, बंधू- भगिनी, या सर्वांनी त्यांचं अभिनंदन केले व त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments