Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटन सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न


सोलापूर (प्रतिनिधी):-बहुजना हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदाधिकारी मेळावा रविवार दिनांक 27 4 2025 रोजी रंगभवन चौक येथील समाज कल्याण हॉल या ठिकाणी आयोजित केली होती सदर बैठकीस सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ वैराग माढा करमाळा माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा येथील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजना का अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक दयानंद बनसोडे ,अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष रफिक भाई बागवान ,पश्चिम महाराष्ट्र सचिव कालिदास कसबे ,जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर ,जिल्हा कार्याध्यक्ष आहद काझी ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष माजीद बागवान, महिला जिल्हाध्यक्ष लैला जमादार मॅडम ,यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यापासून करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत जे कार्यकर्ते सामाजिक कार्यात कमी जास्त प्रमाणात कार्यरत होते अशा कार्यकर्त्यांना कान टोचण्या देत यापुढे सामाजिक कार्याची गती वाढवण्याची सूचना संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी केली व यापुढे जे पदाधिकारी लोकांच्या समाजाच्या आडी अडचणी लोकांच्या पर्यंत जाऊन सोडणार नाहीत त्यांना मदत करणार नाहीत अशा कार्यकर्त्यांचे यापुढे संघटनेतील धारण केलेले पद धोक्यात येईल असेही ठणकावून सांगितले याप्रसंगी अक्कलकोट तालुका अध्यक्ष सचिन पालखे, बार्शी शहराध्यक्ष दीपक पाटील ,सांगोला तालुका अध्यक्ष सिद्धू यादव , मंगळवेढा तालुकाध्यक्ष अर्जुन सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष लैला जमादार मॅडम ,इत्यादींनी आपापले विचार मांडून सदर पदाधिकारी मेळाव्यास संबोधित केले संपूर्ण पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून समाजाच्या तळागाळातील ,शोषित, पीडित ,वंचित, घटकापर्यंत तसेच शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या यातना दुःख आणि अडचणी शासन प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देत शासन प्रशासनाच्या कार्यालयातील चालत असलेलाभ्रष्टाचार हानागोंदी कारभार अनियमितता यावर कार्यकर्त्यांनी बारीक नजर ठेवून चालत असलेला भ्रष्टाचार अनागोंदी कारभार याप्रती जोरदार आवाज उठवून जनतेच्या कामाप्रती त्यांच्या समस्या प्रती दक्ष राहण्याचे आवाहन केले याबाबतीत केलेल्या सूचना मार्गदर्शन याप्रमाणे कार्य करून बहुजन हक्क सामाजिक संघटनेच्या कामाची उंची वाढवून समाजापुढे आदर्शवत कार्य करण्याची हमी दिली यापुढे संघटनेच्या माध्यमातून जो पदाधिकारी उत्कृष्टपणे समाजाचे सामाजिक काम सामाजिक बांधिलकी समजून करेल त्यांचे वरील अन्याय अत्याचारा प्रकरणी त्यांना न्याय देईल अशा कार्यकर्त्यास उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दर महिन्याच्या संघटनेच्या वर्कशॉप बैठकीमध्ये गौरवण्यात येईल असेही ठरले जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचून संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान समस्या अभियान समस्या निवारण अभियान यासह संघटनेचे अंतर्भूत महत्त्वाचे प्रोग्राम समाजामध्ये जाऊन राबविण्याबाबत ठरले सदराचा पदाधिकारी मेळाव्यामध्ये संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांचा सत्कार सांगोला तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर यादव व संपूर्ण तालुका युनिटच्यावतीने करण्यात आला या पदाधिकारी मेळाव्यामध्ये मोहोळ बार्शी सांगोला सोलापूर शहर आधी ठिकाणच्या काही रिक्त पदाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर व कार्यक्रमाचे सांगता व आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष अहद काजी यांनी केले

Post a Comment

0 Comments