Hot Posts

6/recent/ticker-posts

*देवाचे सेवक बि. प्रदीप चांदेकर यांचा वाढदिवस आनंदात साजरा*

नारायण अलदार (प्रतिनिधी)पुणे:- पुण्यातील   धानोरी भागातील देवाचे सेवक बि. प्रदीप चांदेकर यांच्या जन्माचा वाढदिवस 8 जानेवारीला संध्याकाळी मोठ्या आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांची उपस्थिती ह्याठिकाणी ओसंडून वाहत होती.

अशा आनंदाच्या क्षणी अनेक राजकीय कार्यकर्ते व समाज बांधव त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मान्यवरांची उपस्थिती पाहून बि. प्रदीप चांदेकर यांना फार गहिवरून आले आणि देवाच्या मंडळींचे प्रेम पाहून त्यांनी परमेश्वराचे व आलेल्या मंडळींचे मनापासून आभार मानले. वयाच्या 68 वर्षापर्यंत देवाने मला चांगले सांभाळले व मला चांगले आरोग्य दिले आणि माझ्यावर खरे प्रेम करणारी मंडळी देवाने मला दिली यासाठी त्यांनी देवाचे खूप खूप मनापासून आभार व उपकार मानले. त्यानंतर सर्व जनमानसांच्या उपस्थितीत त्यांच्यासाठी केक कापण्यात आला व उपस्थितांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा भेटी आणून त्यांना आशीर्वादित केले. त्यांच्याबरोबर सर्वांनी आनंदात एकत्र प्रीती भोजन केले.

याप्रसंगी सर्व सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्याबरोबर देवाचे सेवक बि. निकाळजे साहेब, पा. अल्फान्सो जोसेफ, पा. अरुण गायकवाड, पा. विजय नायर, पा. विजय राजगुरू, पा. नेहा दळवी, पा. प्रकाश गायकवाड, पा, सूर्यकांत साळुंखे, पा. मनोज साळवी, पा. राजेश, पा. मुरली नायर, पा. मोजेस ससाणे, ब्र. सेवी अँड टीम, ब्र. केदारी, ब्र. मनोज उंडे आणि उंडे अंटी, अॅड. नितिन चांदेकर, निशिकांत चांदेकर व इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

Post a Comment

0 Comments