Hot Posts

6/recent/ticker-posts

*सोलापूर महानगरपालिका निवडणूक - २०२६, प्रभाग क्रमांक २ (क) सर्वसाधारण महिला संवर्गातून हमिदा मुस्ताक पटेल यांना*खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुरस्कृत उमेदवारीचे पत्र



   अकबर शेख (प्रतिनिधी) :-सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ (क) सर्वसाधारण महिला या संवर्गातून हमिदा मुस्ताक पटेल यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीअंतर्गत पुरस्कृत करण्यात आले आहे. याबाबतचे पुरस्कृत उमेदवारीचे पत्र जनवास्तल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते हमिदा मुस्ताक पटेल यांना प्रदान करण्यात आले.

या निवडणुकीत हमिदा मुस्ताक पटेल या ‘सफरचंद’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार त्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्य सुविधा या विषयांना प्राधान्य देत काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष जनतेशी जोडलेले, संघर्षशील आणि समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार पुरस्कृत करत आहे. हमिदा मुस्ताक पटेल या जोमाने, सकारात्मकतेने व जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवून प्रभागातील प्रश्न प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारीचे पत्र स्वीकारताना हमिदा मुस्ताक पटेल यांनी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून, प्रभाग क्रमांक २ (क) मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ (क) सर्वसाधारण महिला संवर्गातून ‘सफरचंद’ चिन्हावर काँग्रेस पक्षाकडून पुरस्कृत हमिदा मुस्ताक पटेल यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभाग क्रमांक 2 चे सर्व उमेदवार सर्व पॅनल शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार नाव कांबळे प्रशांत यशवंतराव मनसे  सेना उमेदवार नाव भोसले सौ संध्या गणेश उद्धव ठाकरे गट शिवसेना चव्हाण दिनेश सुभाषसिंग चार लोकांचा पॅनल  यावेळी उपस्थिती अशोक निम्बर्गी सर तिरुपती परकेपटला जिल्हा सरचिटणीस अकबर शेख महबूब होगे सुलतान शेख महेबुब पटेल मुस्ताक पटेल फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे सर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments