नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे :-
पुण्याच्या विमानतळ स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चंदन नगर जवळ असणारया खुळेवाडी भागात काही महिला गांजा विक्री करीत आहेत. त्या अनुषंगाने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांना कळविली असता त्यांनी बातमीची शहानिशा करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
तपास पथकातील स्टाफने सापळा रचुन आरोपी क्रमांक 1) सोनाबाई अंकुश पवार वय ५० वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे. आरोपी क्रमांक २) सुवर्णा अशोक पवार वय २५ वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे. आरोपी क्रमांक ३) शालन कांतीलाल जाधव ४५ वर्ष रा. लक्ष्मीमाता मंदीराजवळ खुळेवाडी पुणे या तीन महिला गांजा विक्री करीत असताना पोलिसांना आढळल्यामुळे त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर तीन महिला आरोपी यांचेकडुन तीस हजार रुपये किंमतीचा 1560 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हया तीन महिलांविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.क्र ४७४/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चेतन भोसले हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी सना शेख, लालु कन्हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे यांचे पथकाने केली आहे.
0 Comments