Hot Posts

6/recent/ticker-posts

*ग्रामीण पोलीस काॅन्स्टेबलने दारूच्या नशेत दिली 6 वाहनांना धडक*



  नारायण अलदार (प्रतिनिधी)पुणे  :- दारूच्या नशेत गाडी चालवणारया पोलीस कॉन्स्टेबलने 5 ते 6 वाहनांना धडक दिली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. आरोपी इनामे यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील रांजणगाव एम.आय.डी. सी. मध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हयांनी रविवारी रात्री एका पार्टीत दारू पिऊन आले होते. या दारूच्या नशेत इनामे पुणे - नगर रस्त्यावरून जात होते. या दरम्यान त्यांनी सहा गाड्यांना धडक दिली. या धडकेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. 

घटनास्थळी दाखल असलेल्या नागरिकांनी या नशेत असलेल्या कॉन्स्टेबल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होऊनही पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. तसेच आरोपी पोलीस कॉन्स्टेबलची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र आता पुणे ग्रामीण पोलिसांनी कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांना अटक केली आहे.पुणे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, इनामे यांनी रविवारी दारूच्या नशेत वाहन चालवत 6 वाहनांना धडक दिली होती. या धडकेत अनेक नागरिक गंभीर झाले आहेत. याप्रकरणी इनामे यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय हेमंत इनामे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिस अधीक्षक गिल यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments