Hot Posts

6/recent/ticker-posts





अकबर शेख (प्रतिनिधी):-गुजरात मधील वलसाड येथे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी वलसाड व हैदराबाद येथील पीपल्स प्लाझा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कॅन्डल मार्च मध्ये सहभागी होऊन निष्पाप भारतीय नागरिकांचे हत्या करणाऱ्या या आतंकवाद्यांच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध केला. देशांवर ओढवलेल्या दुःखद प्रसंगात आम्ही सरकार सोबत आहोत. केंद्र सरकारने या अतिरेक्यांवर आणि त्यांच्या मास्टरमाइंड वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच यावेळी या दुर्दैवी आतंकी हल्यात बळी पडलेल्या २७ निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कॅन्डल मार्च मध्ये काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी, नागरिक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता

Post a Comment

0 Comments