Hot Posts

6/recent/ticker-posts

माने परीवाराचा लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा

नारायण अलदार (प्रतिनिधी)मंगळवेढा:- मंगळवेढयातील देवाचे सेवक नितीन माने आणि अंजली माने ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी संध्याकाळी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. 

यावेळी स्थानिक समाज बांधव त्यांच्या आनंदात सहभागी होते. या दांपत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी वडिलधारी वयस्कर मंडळी व इतर जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या या भावी वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा  दिल्या. शुभेच्छांचा झालेला वर्षाव पाहून माने परिवाराचे हदय भरून आले. आपल्यावर प्रेम करणारया सर्वांचे त्यांनी केक कापून आभार मानले. सर्वांसोबत एकत्रितरित्या त्यांनी भोजन करून आनंद साजरा केला. 

देवाचे सेवक नितिन माने ह्यांची समाजाशी चांगली सामाजिक बांधिलकी असल्यामुळे अनेक मान्यवरांनी त्यांना फोन करून पुढिल भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हया लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाले असे म्हणून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पारीवारीक जबाबदारी सांभाळताना अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले, त्या प्रत्येक संकटात देवाने त्यांना अनेक माणसांच्याद्वारे  मदत केली. त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी अनेक चांगले समाज बांधव देवाने दिले असे म्हणून त्यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानले. 

याप्रसंगी उपस्थित असणारया समाज बांधवांपैकी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत उर्फ बाबा काशीद, सुवर्णा काशीद, अमोल हत्तेकर, रघुवीर हत्तेकर, यश माने, श्रेया माने यांनी एकत्र येऊन आनंदात व उत्साहात लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

Post a Comment

0 Comments