Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नगरसेवक महायुतीच्या गोटात शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय


जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई :-महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव नगरसेवक अजिंक्य रावराणे महायुतीच्या गोटात सामील झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने या निवडणुकीत शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गट, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्रितपणे लढवली होती. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका बदलली आहे. प्रभागासाठी निधीची उपलब्धता आणि विकासाच्या दृष्टीने आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे रावराणे यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका बदलली आहे. 

महापालिकेत महायुतीचे निर्विवाद बहुमत असले तरी देखील महायुती समोर आव्हान उभे करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आपले तगडे उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments