जगदीश कोरे (प्रतिनिधी) मुंबई.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आपला दिनांक 9 फेब्रुवारी रोजी चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या दिवशी वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये तसेच फलक लावू नये, अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली हानी न
भरून येणारी आहे. मी व्यक्तिशः एक कर्तव्यदक्ष सहकारी आणि जवळचा मित्र गमावला आहे. अशा परिस्थितीत कोणतेही कार्यक्रम करणे आणि वाढदिवस साजरा करणे उचित ठरणारे नाही. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी या निमित्ताने नमूद केले आहे.
वाढदिवसासाठी कोणतेही कार्यक्रम अथवा फलकांचा खर्च टाळून त्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी अथवा गरजूंना मदत करण्यासाठी केला जावा, अशा सूचनाही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
0 Comments