Hot Posts

6/recent/ticker-posts

*राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे लाक्षणिक उपोषण*

सोलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र  कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रानां पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये प्रति वर्ष जाहिराती मिळायच्या सन 2018 पासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना जाहिराती देणे बंद केलं आहे.
सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकाना डी टी पी व छपाई चा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत. समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाई चा खर्च त्याच बरोबर छोटया  यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रानी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिक पणे सेवा म्हणून समाज जागृती चे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे.
राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्रव्यवहार केला असून  राज्य सरकार ने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने  राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी 
पत्रकार सुरक्षा समिती लक्षणिक उपोषण करण्यात आले.
*यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती न मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार*
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्यसरकार ला इशारा 
 महाराष्ट्र राज्यातील यादी व नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने  सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले  
 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख  जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शहानवाज कंपनी सुमित भांडेकर कुणाल धोत्रे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटे सिद्धेश्वर पुजारी जाहेद बागवान श्रीकांत कोळी नागनाथ गणपा शब्बीर तांबोळी खालिद चंडरकी अकबर शेख अरविंद नागटिळक सादिक नदाफ कबीर तांडूरे अरुण सिडगिद्दी दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे जमजम चे संपादक झाकीर हुंडेकरी मोहन थंळगे सूर्यकांत व्हनकवडे रोहित घोडके शब्बीर शेख आदिल पटेल एजाज खलिफा कलीमभाई शेख वसीम देशमुख इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments