Hot Posts

6/recent/ticker-posts

मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह...!



दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून, मंद्रुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, मंद्रुप पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर-विजयपुर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती दिनांक 25 मे रोजी मंद्रुप पोलिसांना समजली. मंद्रुप पोलिसांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
हा मृतदेह पुरुष जातीचा सडपातळ असून, याचा रंग काळा सावळा आहे. तसेच ४० ते ४५ वर्ष वय असल्याचा अंदाज आहे. सदर‌ मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रुप पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
अधिक तपास सहायक पोलिस फौजदार प्रमोद आसादे, व संदिप काशीद हे करत आहेत.
सदर मृतदेहाच्या चेहरेपट्टीवरून व त्याचे उजव्या हाताचे मनगटात असलेल्या पांढऱ्या धातूचे कड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता आहे..

Post a Comment

0 Comments