Jagdish Kore पत्रकार: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला तगडा झटका बसला आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचे? याबाबत ठरवत होते.
पण निकाल अतिशय वेगळा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. याच दाव्यासह महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
0 Comments