पत्रकार: आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीत मागील दहा वर्षाच्या विकासाच्या जोरावर आपला प्रचार केला विरोधातील कुणावरही त्यांनी टीका केली नाही जितके समोर जास्त उमेदवार येतील तेवढा फायदा देशमुखांना होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
काँग्रेस पक्षाला दिलीप माने यांना डावलणे महागात पडल्याचे दिसून येते. तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने अमर पाटील यांची पण अडचण झाली त्यातच दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून शेवटच्या क्षणी एबी फॉर्म न दिल्याने ते प्रचंड नाराज झाले त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते ही चिडून होते. याचा वचपा त्यांनी या निवडणुकीत काढल्याचे पाहायला मिळते. आता दिलीप माने पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दक्षिणच्या रिंगणात ऐनवेळी धर्मराज काडादी यांची इंट्री झाल्याने सर्वच गोंधळ उडाला त्यांच्यामुळे सुभाष देशमुख हे वनवे झाल्याचे पाहायला मिळाले. एक वेळेस काडादी हे निवडून येतील अशी शक्यता होती परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुभाष देशमुख यांनी लिंगायत, धनगर, मुस्लिम, बंजारा, आंबेडकरी, पद्मशाली अशी सर्वच समाजाची मते घेण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यामुळेच एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. बापूवर नाराजपणा दाखवून काड्या करणाऱ्या माजी नगरसेवकांना या विजयाने चांगलाच चपराक बसल्याचे दिसून येते.
0 Comments