Hot Posts

6/recent/ticker-posts

कोयता गॅगमधील गुंडाचा पुण्यात राडा



पुणे प्रतिनिधी नारायण अलदार:- आपण पुण्यातला 
भाई आहे आणि मी  कुणाच्या बापाला घाबरत नाही असे बोलून पुण्यातील लोहगाव परिसरात दहशत पसरवून राडा करणारया कोयता गॅगमधील एका गुंडांच्या पुणे पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

राडा करणारा हा गुंड पान शॉप-अंडा भुर्जीच्या गाड्यावर दहशत पसरवत असल्याचे पोलीस तपासात आढल्यावर पोलीसांनी त्याला जेरबंद केले. चहा उधारीवर न दिल्याने या गुंडाने जीवे मारण्याची धमकी एका व्यावसायिक दुकानदाराला दिली असल्याचे तपासात पोलीसांना आढळले. त्याने पान शॉप, अंडाभुर्जीच्या गाडीवरील साहित्याची तोडफोड केली. 

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव अक्षय संजय सगळगिळे, वय 20, रा. संतनगर, लोहगाव असे आहे. अक्षय सगळगिळे याच्या टोळीवर तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली होती. 

रोहन चव्हाण यांच्या टोळीने बुधवार पेठेतील व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. त्यात टोळीत अक्षय सगळगिळे याचा समावेश होता.

याबाबत विशाल कैलास पालखे, वय 22, रा. लोहगाव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील करण पान शॉपमध्ये १२ डिसेंबर रोजी सव्वा दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा फिर्यादीच्या पान शॉपवर आला. त्याने चहा उधारीवर मागितला. फिर्यादी याने उधारीवर चहा न दिल्याने अक्षय याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी कोयता हवेमध्ये जोरजोरात भिरकावून मी इथला भाई आहे कुणाच्या बापाला घाबरत नाही कोणीमध्ये आला तर त्यांची खांडोळया केल्याशिवाय राहणार नाही, असा आरडाओरडा केला. फिर्यादी यांच्या दुकानाच्या काऊंटरवर कोयता मारुन शॉपमधील साहित्याचे नुकसान केले. 

त्यांच्या शेजारील सुधाकर म्हस्के यांच्या अंडाभुर्जी हातगाडीवरील अंड्याचे ट्रे फोडले. राईस फेकून दिला. लाईटचे बल्ब फोडले. तसेच फ्रीजवर कोयते मारुन नुकसान करुन परिसरामध्ये दहशत माजविली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंदन पुढिल अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments