पुणे प्रतिनिधी (नारायण अलदार ):-पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. असे असताना एस टी बसमध्ये एका दारुड्या व्यक्तींना महिलेचा छेडछाड होत असताना त्या महिलेने त्या दारूडयाला चांगला चोप दिला.
पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका दारूडयाने महिला प्रवासी प्रिया यांची छेड काढली, त्यावेळी प्रिया यांनी त्या दारूडयाला चांगलाच चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला प्रिया हया पुण्याच्या शनिवारवाड्याच्या समोर असणारया पोलीस चौकीत घेऊन गेल्या. परंतु पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अर्धा तास प्रिया यांनी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले, त्यानंतर प्रिया यांनी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर काही वेळाने पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत आले. परंतु एसटी बसमध्ये बसलेल्या महिलांपैकी त्यांच्या मदतीला एकही महिला पुढे आली नाही. त्यांच्यासोबत त्यांचे पती, गाडीचे ड्रायव्हर आणि बस कंडक्टर इतकेच जण होते. सर्व महिला प्रवासी एसटी बस सोडून दुसऱ्या एसटी बसमध्ये पुढे निघून गेल्या. अशावेळी सर्व महिलांनी एकत्र येणे खूप गरजेचे असते. महिलांची छेडछाड काढणारयांना वेळेतच वठणीवर आणावे लागते. तरच अशाप्रकारचे महिलांवरील अत्याचार बंद होतील असे महिला प्रवासी प्रिया म्हणाल्या.
0 Comments