जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापुर : आपले कर्तबगार जिल्हा सरकारी वकील प्रा. ॲड. प्रदीपसिंह राजपूत सर यांनी लिहिलेल्या
*राजपूत पॉकेट बुक*
(बी.एन.एस.(B.N.S.), बी.एन.एस.एस.
(B.N.S.S.) आणि बी.एस.ए. (B.S.A.) )
या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अतुल कुलकर्णी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे व इतर पदाधिकारी आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ०९/१२/२०२४ रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले.
सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात रजपूत सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलीसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. श्रीनिवास क्यातम,
ॲड. एस. एस. सदाफुले,
ॲड. गंगाधर रामपुरे, त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल आणि राजपूत सरांनी हे पुस्तक मोफत दिल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले.
पुस्तकाचे लेखक ॲड. प्रदीप सिंह राजपूत सरांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला.
तसेच त्यांनी १०० जन्मठेप आणि दोन फाशी शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे,
सचिव ॲड. मनोज नागेश पामूल,
सहसचिव ॲड. निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे सह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते.
0 Comments