Hot Posts

6/recent/ticker-posts

मा खा प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी, मुंढेवाडी, कातेवाडी या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला, ग्रामस्थांचा मोठ्ठा प्रतिसाद

अकबर शेख (प्रतिनिधी):-सोलापूर लोकसभा मतदासंघांतील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी गोटेवाडी,मुंढेवाडी ,कातेवाडी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.

यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, मुंढेवाडी चे सरपंच राहुल व्यवहारे, रतन कसबे, कोकरे महाराज, त्रिंबक जाधव, मुंढेवाडी चे सरपंच राहुल व्यवहारे, शिवाजी वळगुंडे, अप्पा हांडे, शेंडगे मॅडम, दाजी मशाळ, केशव खाडे, चंद्रकांत खाडे, रंजनाताई क्षीरसागर, विकास क्षीरसागर, घाटे मॅडम, लक्ष्मण भालेराव, शिवाजी जाधव, दाजी वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments