Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या :- खा. प्रणिती शिंदे

 प्रतिनिधी अकबर शेख सोलापूर :-शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, काँग्रेस भवन सोलापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त त्यांचा प्रतिमेस पुष्पहार खासदार प्रणितीताई शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सावित्रीबाईं फुले यांच्या संघर्षामुळे आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलो. आम्ही संसदेत वारंवार मागणी केली की सावित्रीबाईंना भारतरत्न देण्यात यावे. आगामी काळात सावित्रीबाईंना भारतरत्न मिळेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. पुरोगामी महाराष्ट्र आज  मागे पडला आहे. महाराष्ट्रात महिलांवर, दिनदलीत, अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत आहे. दिवसाढवळ्या सरपंचांचे खून होत आहेत. बीड, परभणी, बदलापूर यांसारख्या घटना वाढत आहेत. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था ढासळली. गुन्हेगार कायदा सुव्यवस्था हातात घेतात आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतात. परभणी प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळा असूनही मुख्यमंत्री सभागृहात खोटे सांगतात. आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे. लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मीक कराड सारखे गुन्हेगार जेलमध्ये बसून कट रचतात. गुन्हेगार जेलमध्ये बसून इंटरव्यू देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत म्हणजेच महाराष्ट्राचा युपी बिहार करत आहेत. गोरगरीब मरत असताना मंत्रीपद वाटपात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात कोणीही सुरक्षित राहिले नाहीत. म्हणून या सर्व घटनांवरून मी मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करते.
         खून झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने पोलीस संरक्षण मागितले मात्र तिला संरक्षण दिले जात नाही. बीडमध्ये प्रचंड दहशतीचा वातावरण निर्माण झाले. पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातो मग सामान्यांना न्याय कसा मिळणार. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा १०० टक्के राजीनामा झाला पाहिजे काँग्रेसच्या काळात दोष नसला तरी लोकांच्या दबावापोटी नैतिकता म्हणून राजीनामा दिले जायचे मात्र हे निगरवट्ट आणि अहंकारी सरकार आहे ते राजीनामा देणार नाही. राज्यकर्त्यांकडून आत्ता लोकांच्या अपेक्षा राहिल्या नाहीत. महाराष्ट्राला पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. 
लाडकी बहीण ह्या निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे. इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत. लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहे तिला सावत्र करू नये.

या कार्यक्रमास मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, बसवराज म्हेत्रे, मयूर खरात, अंबादास गुत्तिकोंडा, हारून शेख, युवराज जाधव, महेश लोंढे, अनिल मस्के, हेमा चिंचोलकर, सुमन जाधव, नूर अहमद नालवार, तिरूपती परकीपंडला, विवेक कन्ना, हसीब नदाफ, पशुपती माशाळ, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, प्रवीण जाधव, वैभव पाटील, शंकर नरोटे, गिरिधर थोरात, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, चंद्रकांत टिक्के, धोंडप्पा तोरणगी, एजाज बागवान, वशिष्ठ सोनकांबळे, ज्ञानेश्वर जाधव, नागनाथ शावणे, राजेश झंपले, श्रीशैल रणधिरे, विवेक इंगळे, शिवाजी साळुंखे, धीरज थोरात, शाहू सलगर, धीरज खंदारे, संतोष सोनवणे, मोहसीन फुलारी, हजी मेहमूद शेख, श्रीकांत दासरी, आप्पा सलगर, शोभा बोबे, चंदा काळे, ज्योती गायकवाड, शुभांगी लिंगराज, अश्विनी भोसले, अनिता भालेराव, पूजा पवार, प्रियांका गुंडला, पूजा नुल्लूलवार, निशा मरोड, अश्विनी सोलापूरे, चंद्रकला निजमल्लू, धैर्यशिल बाबरे, व्यंकटेश बोम्मेन, जब्बार शेख, दत्तात्रय गजभार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments