Hot Posts

6/recent/ticker-posts

*सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खासदार प्रणितीताई शिंदे

प्रतिनिधी अकबर शेख (पत्रकार) :-सोलापूर २६ जानेवारी १९५० रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे "भारतीय संविधान" अंमलात आले, आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी हा दिवस "प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सर्व सोलापुरवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.

▬▬▬ஜ۩( अकबर शेख पत्रकार सोलापूर )۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments