Hot Posts

6/recent/ticker-posts

*कर्णबधिरांचे कौशल्य वाखाणण्याजोगे*- शहाजिराव सोळुंके.


 जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापूर.- येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात 26 जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या ध्वज वंदनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी आय पी एस अधिकारी तथा पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण पुणे येथील विभागीय अधिकारी डॉक्टर शहाजीराव सोळूंके  बोलत होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम बघून ते भारावून गेले.  कर्णबधिरत्व असूनही कुठेही दिव्यांगत्वाची उणीव जाणवत नाही असेही ते म्हणाले.
  प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक आणि शाळेचा परिचय मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी करून दिला.  प्रमुख पाहुण्यांचा स्वागतपर पुष्पगुच्छ देऊन सत्कार रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  शाळेचे सचिव सुनील दावडा  यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.  या प्रसंगी आयडोल्स  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कुणाल बाबरे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. श्री कुणाल बाबरे यांच्या तर्फे विद्यार्थ्याना खाऊ देण्यात आला. सर्व मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. 
या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपाळ झंवर, हिरालाल डागा, बळीराम पावडे, विवेक खमीतकर, आरती गांधी, आसावरी सराफ, संजय चौगुले, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिताळकर, योगिता बोधले,गजानन गडगे, नागनाथ बसाटे ,सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे ,सक्लेन बडेखान, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे,गंगाधर मदभवी,साहेब गौडा पाटील, अजित पाटील, बाबासाहेब पवार,सोमनाथ थोरात, शबाना शेख, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments