प्रतिनिधी अकबर शेख :-सोलापूर लोकसभा मतदासंघांतील मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी
बालाजी नगर,कर्जाळ/कात्राळ, कागष्ट
या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मंगळवेढा काँग्रेस युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर, संदीप पवार उपसरपंच सौ पवार, श्रीकांत पवार, गणपती पवार, अमर रजपूत, बालाजी नगर आश्रम शाळा अध्यक्ष, राठोड, विजय माने, दादा पटेल, सौ माने, विजय भोसले, रणजीत जगताप, दादा काकेकर यांच्यासह ग्रामस्थ मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬
0 Comments