Hot Posts

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई येथे सन्मानित



     जगदीश कोरे पुणे: प्रतिनिधी.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांना Southwestern American University च्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई येथे सन्मानित करण्यात आले. 

गेली ३२ वर्ष गोरे हे साहित्य संवर्धनाचे कार्य करीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्या नेतृत्वात १८० साहित्य संमेलने कोणतीही शासकीय मदत न घेता यशस्वीपणे आयोजित केली आहेत. इतकी संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती आहेत. 

हजारो साहित्यिकांना त्यांनी आजवर विचारपीठ मिळवून दिले आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी काव्य अनुवाद केला असून इतर ९ ग्रंथाचे विपुल लेखन केले आहे. रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग, एैतवी, सूर्या एक प्रेरणादायी प्रवास, फुल टू हंगामा आदी मराठी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे व गीतलेखन व संगीत हि दिले आहे. त्यांच्या 'सूर्या एक प्रेरणादायी प्रवास' या मराठी चित्रपटाने कान्स, बर्लिन_सारख्या जगविख्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिकावर आपली विजयी मोहर उमटवली आहे.धर्माची दारू जातीची नशा या नाटकाचे व महापूजेची उत्तरपूजा, अन्नदान की पिंडदान, बर्हिवासा, पंखातलं आकाश आदी लघुचित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.

गोरे संपादक असलेल्या युगंधर प्रकाशन या संस्थेच्या वतीने आजवर १४४ दर्जेदार ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. शिवव्याख्यानासह विविध विषयावर त्यांनी २ हजाराहून अधिक व्याख्याने महाराष्ट्रात दिली आहेत. महाराष्ट्र गौरवसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments