Jagdish Kore पत्रकार: प्रतिनिधी बीड: दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अद्याप त्याचं नाव सरपंच देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नसलं तरी तपास यंत्रणांकडून त्याचे लिंक शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. अलीकडेच खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यानं वाल्मिकविरोधात कबुली दिली होती. वाल्मिकने आपल्या फोनवरून पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचं चाटेनं चौकशीत सांगितलं होतं. तसेच वाल्मिक कराड याचं दोनवेळा सुदर्शन घुलेशी फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर वाल्मिक कराडला जिल्हा प्रशासनानेही दणका दिला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द केला असून लवकरात लवकर शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरं तर, मागील काही काळात बीड जिल्ह्यात एकूण 1281 जणांना शस्त्र परवाने दिले होते. यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2005 जणांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचा पुनर्विचार व्हावा, असा अहवाल बीडचे तत्कालीन अधीक्षक अविनाश बारगळ यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता.
0 Comments