Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यू बुधवार पेठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मा खा प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त महिलांस हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

अकबर  शेख (प्रतिनिधी):-सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रा. कु. संघमित्रा चौधरी यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमिताने न्यू बुधवार पेठ डॉ. आंबेडकर नगर जुना बस डेपो समोर सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळ येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महिलांसाठी हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी या समारंभाला उपस्थिती लावली. खासदार प्रणिती शिंदे आणि संयोजक अँड संघमित्रा चौधरी यांनी उपस्थित महिला भगिनींना हळदी-कुंकू करून, तिळगुळ आणि वाण वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित महिलांशी महिला सबलीकरण, वाढती महागाई व विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी सोलापुर शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ. प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या सह सौ. मुमताज तांबोळी, सौ.वर्षा अतणुरे, सौ.छाया हिरवटे व सुंदरबाई गायकवाड, भागूबाई आठवले, सुनिता कांबळे, सुजाता सुरवसे, वेदश्री सावंत,वसुंधरा बनसोडे, साधना वजाळे, अस्मिता कांबळे,इतर महिला पदाधिकारी व तसेच सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील महिला,माता, भगिनी लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले तर मान्यवरांचे आभार कार्यक्रमाच्या मुख्य संयोजीका प्रा. कु. संघमित्रा बाबुराव चौधरी यांनी मानले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक चौक जयंती उत्सव मंडळातील पदाधिकारी व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

▬▬▬ஜ۩( अकबर शेख पत्रकार )۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments