Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार सोलापुर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन

अकबर शेख (प्रतिनिधी)सोलापूर जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, लोकशाहीचे रक्षणासाठी, मतदारांच्या हक्कांसाठी, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात यावे या मागणी साठी खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय निदर्शने आंदोलन करून मा. निवासी जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मतांची झालेली चोरी करून सत्ता काबीज केले हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे. याबत माहिती मागितली असता दिली जात नाही. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. घटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिले आहे पण evm मध्ये फेरफार करून निकालात बदल केले जात आहे. अशी शंका सामान्य माणसाला वाटत आहे. म्हणून काँग्रेस पक्षासहित सर्व विरोधी पक्षाने EVM मशीनचा वापर बंद करून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यात यावेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी, निवडणुका निष्पक्षपणे होण्यासाठी जनतेने या लढ्याला पाठिंबा दिला. हा लढा विजय किंवा पराजयाचा नसून लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे. निवडणूक आयोगाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा असे आवाहन केले.

या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस मा. नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हणमंतू सायबोलू, बसवराज म्हेत्रे, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, सुशील बंदपट्टे, तिरूपती परकीपंडला, नागनाथ कदम, मयूर खरात, पशुपती माशाळ, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, नागेश म्हेत्रे, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, हारून शेख, शिवशंकर अंजनाळकर, गिरीधर थोरात, एजाज बागवान, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, प्रशांत कांबळे, सुमन जाधव, शोभाताई बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावणे, ज्योती गायकवाड, सलिमा शेख, चंद्रकला निजमल्लु, निता बनसोडे, सुनील डोळसे, अभिलाष अच्युगटला, प्रशांत सोनवणे, सुरेखा पाटील, अनिता भालेराव, मीना गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩( अकबर शेख सोलापूर )۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments