Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात ४ मार्चला सुनावणी

Jagdish Kore (प्रतिनिधी) मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज (मंगळवार, २५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील जनतेचं व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. न्यायालय या संदर्भात शासनाला, निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार याबाबत सर्वांच्याच मनात उस्तुकता आहे. न्यायालय आजच निर्देश देणार की सुनावणीची पुढची तारीख देणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढखलल्या जाऊ शकतात. या सर्व चर्चा व प्रश्नांना आज पूर्णविराम मिळू शकतो

Post a Comment

0 Comments