अकबर शेख (प्रतिनिधी):-सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री श्री.श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी जनवात्सल्य निवास येथे जनवात्सल्य दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका हे दुसरे वर्ष असून माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब व सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी व देशासाठी केलेल्या विकास कामाची माहिती छायाचित्राद्वारे या दिनदर्शिका मध्ये प्रकट करण्यात आलेली आहेत. अशी माहिती संयोजक श्री. सातलिंग शटगार सर यांनी दिली.
याचबरोबर या दिनदर्शिकेमध्ये सण, वार, तिथी,राशी भविष्य, विवाह मुहूर्त, वास्तु मुहूर्त, थोर पुरुषांचे जयंती,पुण्यतिथी, हवामान व पर्यावरण विषयी छान माहिती देण्यात आली असून सर्वांना या दिनदर्शिकेचा उपयोग होणार आहे. असे संयोजकांनी सांगितले.
यावेळी सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मंगेश शहा, जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष जहांगीर शेख, महानगरपालिकेचे नगरसेवक रियाजभाई हुंडेकरी, जिल्हा बास्केटबॉलचे सचिव शफी कॅप्टन शेख, अमित चौहन आदि सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(अकबर शेख ) पत्रकार۩ஜ▬▬▬
0 Comments