नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे:-
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या वेळी एका पीडीतेला रिकाम्या बसमध्ये बसवून तिच्यावर बलात्कार करणारया
दत्तात्रय गाडे या नराधमाविषयी माहिती देणा-यास रू. 1,00,000/- एक लाख रुपयांचे बक्षीस पुणे पोलीसांकडून देण्यात येईल आणि माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्वारगेट पो. स्टे. गु. रजि. नं. 59/2025 भा. न्या. सं. 2023 चे कलम 64, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा आरोपी नामे दत्तात्रय रामदास गाडे (वय 37 वर्षे, रा. गुनाट ता. शिरूर, जि. पुणे) याने केला असून तो दाखल गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे. आरोपी नामे दत्तात्रय गाडे याचे विषयी माहिती देणा-यास रू. 1,00,000/- (एक लाख रुपये) बक्षीस देण्यात येईल. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क क्रमांक : स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे 020-24442769
युवराज नांद्रे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पो. स्टे.) मो. क्र. 9881670659
पुनम पाटील (महिला पोलिस उप-निरीक्षक) मो. क्र. 8600444569
वरील क्रमांकावर माहिती कळवावी असे आवाहन पुणे पोलीसांकडून देण्यात आले आहे.
0 Comments