अकबर शेख (प्रतिनिधी) :-सोलापूर "२१ व्या आधुनिक शतकातही समाज विकृत स्थितीकडे वाटचाल करून स्वतःची अधोगती करत आहे. समाजातील काही विकृत घटक या अवस्थेतून वाटचाल करताना स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताना पावलोपावली दिसून येत आहे. एकीकडे आजच्या महिला उत्तुंग भरारी घेऊन वाटचाल करत आहेत तर दुसरीकडे त्यांना मुलींच्या सुरक्षेचा विचार करणे काळाची गरज बनत चालली आहे. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव मुलींनी ठेवली पाहिजे. मोबाईलच्या विघातक वापरातून स्वतःचे आयुष्य आणि करियर कसे उद्ध्वस्त होईल, हे सांगता येत नाही. यासाठी माता-पालकांनी आपल्या मुलींवर चांगल्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजे." असे जोडभावी पोलीस ठाण्याच्या *पोलीस उपनिरीक्षक नशीमुरा शेख मॅडम* यांनी प्रतिपादन केले. महिला दिनानिमित्त श्री. बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस. व्ही. सी. एस. प्रशालेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर* होते, तर प्रमुख अतिथी म्हणून *पोलीस उपनिरीक्षक नशीमुरा शेख,* त्यांच्या सहकारी *अनिता मोरे* व श्री. बृहन्मठ होटगी संचलित एम. आय. डी. सी. शाखेच्या सेवानिवृत्त शिक्षिका *सौ. मंगल पाटील मॅडम* उपस्थित होत्या.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुुभहस्ते *वीरतपस्वी श्री चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी, तपोरत्नं श्री योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेचे पूजन करून *अभिवादन* करण्यात आले.
यासमयी प्रशालेतील सर्व महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तद्नंतर प्रशालेतील राज्यस्तरीय स्काऊट-गाईड पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींनी *पोलीस उपनिरीक्षक शेख मॅडम* यांना *मानवंदना* दिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय स्काऊट-गाईड पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनीने 'मी सावित्री फुले बोलते' याचे सादरीकरण केले. महिला सुरक्षा - काळाची गरज (पथनाट्य), जन्म बाईचा बाईचा, बाईपण भारी, दिवाळी उंची है!, संक्राती कन्नड रिमिक्स टिपरी, संसार संसार रिमिक्स, जन्म बाईचा बाईचा (नाटक) यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता अहिल्यादेवी होळकर, पहिल्या महिला राष्ट्रपती, डॉक्टर, शेतकरी, वकील, शिक्षिका, इंजिनियर, पोलीस कर्मचारी आदी वेश परिधान करून विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर,* उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर* व *पर्यवेक्षक श्री. महादेव वांगीकर सर* यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *कु. अल्फिया बाणेवाले* हिने केले. तर आभार *कु. स्नेहा सोळसे* हिने मानली.
0 Comments