Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण होते*.-- सुधीर खराडकर.


   जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापूर -- आत्मोन्नती नंतर आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवली की सामाजिक कर्तव्य पूर्ती नंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो. ही आपली ओळख अनमोल असते असे विचार सोलापूरचे सहायक पोलीस आयुक्त ट्रैफिक श्री सुधीर खिराडकर यांनी व्यक्त केले.
   रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ने आयोजित केलेल्या  "व्होकेशनल अवॉर्ड्स" च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोलापुरातील व्यवसाय आणि नोकरी च्या क्षेत्रात उत्कृष्ठ काम आणि त्याच बरोबर सामाजिक कार्यातही हातभार लावणाऱ्या व्यक्तींना या प्रसंगी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप - शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे होते. हे पुरस्कार अनुक्रमे 
१) डॉ विजय आठवले - प्राचार्य वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
२) डॉ मोहिनी  तकते - जिमनॅस्टिक आणि फिटनेस च्या इंटरनॅशनल कोच .
३) श्री. गोविंद झंवर - वर्ल्ड ट्रेड एक्सपो, बांबू मिशन  
४) आशिष जवळकर - व्यावसायिक , भावसार व्हिजन,मधून सामाजिक कार्य 
५)सुनिता दळवी - आत्मनिर्भर वस्ती संघाच्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा .
६) प्रद्गन्या कांबळे     - परिचारिका (नर्स) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, औराद येथे सेवा, यांना देण्यात आले.
अशा या वेगळ्या कार्यक्रमात माझा वेळ सत्कारणी लावला तो सुनील दावडा यांनी. त्यांच्यामुळे मला आज या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची संधी मिळाली असेही प्रमुख पाहुणे श्री सुधीर खिराडकर या प्रसंगी म्हणाले आणि क्लब चे कौतुकही केले. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर विजय आठवले यांनी मनोगत व्यक्त केले आणि क्लब चे आभार मानले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा  आणि संचालक सुनील दावडा यांनी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन केला. 
प्रमुख पाहुण्यांचा परिचय वंदना कोपकर यांनी करून दिला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय डॉ सचिन जम्मा, दीपक आहुजा यांनी करून दिला. रोटरी क्लब च्या कार्याची माहिती आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले तर आभार सुनील दावडा यांनी मानले. 
   या कार्यक्रमास कीर्ती दावडा, निर्मला सिताफळे, आरती गांधी, क्षितिजा गाताडे, डॉ बाळासाहेब शितोळे, बळीराम पावडे, मुकेश मेहता, सीताराम महांकाळ, दौलत सिताफळे, संजय चौगुले, दीपक  आहुजा, शितोळे मॅडम, दीपक आर्वे, आनंद पारेकर, गंगाधर मदभवी, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments