Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस; २८ लाखांच्या बनावट नोटा जप्त



 नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे :- पुण्यात बनावट नोटांचस रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.  शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी २८ लाख ६६ हजार रुपये किंमतीच्या दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आणि दोन लाख किंमतीच्या खऱ्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मनीषा ठाणेकर, नरेश शेट्टी, भारती गवंड, प्रभू गुगलजेड्डी या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

*पोलिसांनी जप्त केल्या लाखो रूपये किंमतीच्या बनावट नोटा.* 

शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं १७ एप्रिलला कोटक महिंद्रा बँकेंनं फिर्याद दिली होती की, त्यांच्या बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये २०० रूपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या आहेत. यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपी मनिषा ठाणेकरला अटक केली. आरोपी मनिषा ठाणेकरचा कसून तपास केला असता, तिनं बनावट नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्याची अधिक माहिती घेतली असता, त्याचे नाव रमेश भिमप्पा शेट्टी (रा. लोहगाव) असल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या घरी छापा टाकल्यानंतर पोलिसांना घरामध्ये २०० रूपयांच्या नोटांचे २० बंडल आढळले. ज्याचे बाजारातील मुल्य ४ लाख रूपये इतकं आहे. तर, खऱ्या दोन लाख, ४ हजार रूपये मिळाले. यासोबत २०० रूपयांच्या ६४८ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ५०० रुपयांच्या एकूण २,२३२ प्रिंट केलेल्या बनावट नोटा पोलिसांना आढळल्या. ज्याचे बाजारमुल्य २२,३२,००० इतके आहे. बनावट नोटांची छपाई वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद आणि यासह बनावट नोटा छापण्याचा प्रिंटर पोलिसांनी जप्त केला आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली. 

प्रकरणाचा पुढील तपास सुरू, "या गुन्ह्यातील आरोपी भारती गवंडकडून २०० रुपयांच्या ६०,००० रूपये किंमतीच्या बनावट नोटा, आरोपी मनिषा ठाणेकर कडून २०० रूपयांच्या २०,००० रूपये किंमतीच्या बनावट नोटा, सचिन यमगर याच्याकडून २०० रूपयांच्या २०,००० रुपये किंमतीच्या बनावाट नोटा असं, साहित्य जप्त केलं आहे. नरेश शेट्टीचा अधिक तपास केला असता, या गुन्ह्यामध्ये आरोपी प्रभू गुगलजेड्डीनं मदत केल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून २०० रूपये किंमतीच्या ३,००० रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. आतापर्यंत गुन्ह्यातील सर्व आरोपींकडून एकूण २८,६६,१०० रुपये किंमतीच्या बनावट २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यासह २,०४,००० रुपये किंमतीच्या खऱ्या नोटा, गुन्ह्यात वापरलेल्या कारसह इतर साहित्य जप्त केलं आहे. गुन्ह्यातील आरोपीची नावे निष्पन्न झाली असून अधिकचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments