Jagdish Kore पत्रकार: नवी दिल्ली: वृत्तसंस्था
पाकिस्तानचा भारतद्वेषी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारत विरोधी गरळ ओकली आहे. सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करून तो कायम चर्चेत राहत आला आहे. आता भारत हा पाकिस्तानच्या प्रगतीमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
भारत जोरदार प्रगती करत आहे. भारतातील क्रिकेटचा चांगला विकास झाला आहे. आपण मात्र ज्यांची प्रगती बघून खुश राहत आहोत. प्रत्यक्षात भारताकडून पाकिस्तानच्या प्रगतीला खोडा घातला जात आहे. शेजारी देशाचे हे वर्तन अयोग्य आहे, अशी टीका आफ्रिदी यांनी केली आहे.
यापूर्वी देखील भारताच्या विरोधात आफ्रिदी याने वक्तव्य केले होते. भारत हा स्वतःच दहशतवादाचा अवलंब करीत आहे. आपल्याच माणसांना ठार मारून भारत पाकिस्तानवर दहशतवाद पोसण्याचे आरोप करीत आहे, असे तो म्हणाला होता.
0 Comments