Hot Posts

6/recent/ticker-posts

*मोहम्मद अयाज यांच्या ये धरती है बलीदान की कार्यक्रमात ग्रामीण पोलीस परिवार भावुक*


 जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापुर.- महाराष्ट्र शासनाचे १०० दिवस कृती आराखडा विशेष मोहीम - २०२५ या विशेष मोहीम राबवुन सोलापुर ग्रामीण महाराष्ट्र राज्य चौथा क्रमांक पटकावला या निमीत्ताने पोलीस मुख्यालय येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या गौरव समारंभात सोलापुर चे गायक मोहम्मद अयाज यांचा ये धरती है बलीदान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर चले हम फ़िदा जानोतन साथीयो, हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए , देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया , खेळ मांडला देवा, अशा अनेक निरनिराळी गाणी मोहम्मद अयाज व सह कलाकारांनी सादर केली. या कार्यक्रमात पहेलगाम मधील निष्पाप शहीदाना श्रद्धांजलि अर्पिण करण्यात आले. तसेच पोलीस अधिक्षक मा अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक मा प्रितम यावलकर , उप अधीक्षक मा विजया कुर्री यांनी पोलीस परिवारास संबोधित करत आपण राज्यात चौथा क्रमांक पटकावला पण भविष्यात प्रथम स्थान प्राप्त करु असे सर्व अधिकार्रांना आवाहन केले व सर्वांचे आभार मानले. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी ये धरती है बलीदान या कार्यक्रमातील गायक मोहम्मद अयाज यांचा व सह कलाकारांचा अभीनंदन केले. या वेळी व्यास पिठावर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर , उप पोलीस अधिक्षक विजया कुर्री सह डिवायएसपी, सर्व पिआय , पोलीस परिवार आपल्या परिवारा सह उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments