जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ): मुंबई: पोलिस आणि सुरक्षा दलांनी गडचिरोलीला माओवाद आणि नक्षलवाद यापासून पूर्णतः मुक्त केले असून गडचिरोली आता स्टील हब म्हणून विकसित होत आहे. काही कालावधीतच देशातील सर्वाधिक स्टीलचे उत्पादन गडचिरोलीतून केले जाईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.
आपल्या भाषणात फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल गौरवोद्गार काढले. भारतीय सैन्याने अत्यंत अचूक हल्ले करून हे ऑपरेशन यशस्वी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूर मुळे भारताची ताकद जगासमोर आली, असे नमूद करतानाच मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले.
0 Comments