जगदीश कोरे (प्रतिनिधि) मुंबई:-
नुकतेच मुंबई येथे भारत रत्न बिस्मिल्लाह खान यांच्या स्मृति दिवस " यादें बिस्मिल्लाह " या सांस्कृतिक कार्यक्रमात सोलापुर चे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार तसेच लोढ़ा ग्रुप चे मंजु मंगल प्रभात लोढ़ा , पद्मश्री शास्त्रीय गायिका सोमा घोष, पद्मश्री तबला नवाज पंडित सुरेश तलवलकर , श्री सदगुरू दयालजी, भाजपा चे प्रवक्ता विनोद शेलार , संगीतकार विवेक प्रकाश , मालती जैन (अध्यक्ष एस पी जैन एज्युकेशन सोसायटी) फिल्म डायरेक्टर शुभांकरजी घोष तसेच गायक , संगीतकार , अभीनेत्री, कलाकार मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी शास्त्रीय व उप शास्त्रीय सुगम संगीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या यादें बिस्मिल्लाह सांस्कृतिक कार्यक्रमात गुणवंत कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मोहम्मद अयाज भारत रत्न बिस्मिल्लाह खान यांच्या मानस पुत्री पद्मश्री सोमा घोष यांचा आभार व्यक्त केला आपण मला या ठिकाणी सन्मान देऊन माझ्या कलेची दखल घेण्यात आली हि बाब संपुर्ण सोलापुर करांसाठी अभिमानास्पद म्हणायला हरक़त नाही. हा कार्यक्रम १२ सेप्टेंबर २०१५ सायं ७ वा मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदीर प्रभादेवी येथे पार पडला.
-- फोटो मधे -- सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार , पद्मश्री सोमा घोष , पद्मश्री सुरेश तलवलकर , मंजु मंगल प्रभात लोढ़ा, श्री सदगुरू दयालजी , विवेक प्रकाश इ.-----------------------
0 Comments